‘स्पा’च्या नावाखाली वेश्याव्यवसाय

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

नाशिक :- स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय करणाऱ्या अड्ड्यावर पोलिसांनी छापा मारीत सहा युवतींना ताब्यात घेतले असून स्पा सेंटर चालवणाऱ्या पती-पत्नीविरोधात उपनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नाशिक पोलीस प्रशासनाच्या युनिट दोनच्या महिला पोलीस नाईक ललिता जयराम आहेर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांना माहिती मिळाली की, नाशिक- पुणे महामार्गावरील फेम चित्रपट गृहासमोरील ड्रीम सिटी मार्गावर श्रीजी पिनॅकल बिल्डिंगमधील गाळा क्रमांक १४ मध्ये न्यू लूक स्पा नावाखाली वेश्या व्यवसाय सुरू असल्याचे समजले.

पोलिसांनी बुधवारी रात्री पोलीस निरीक्षक कुमार चौधरी, सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिजित सोनवणे, वसंत खातेले, शामराव भोसले, युवराज पाटील यांनी एक बनावट ग्राहक पाठवला.

या ठिकाणी वेश्या व्यवसाय सुरू आल्याची खात्री पटल्यानंतर पथकाने छापा मारला. पोलिसांनी सहा युवतींना ताब्यात घेतले असून व्यवसाय करणारे संशयित पंडित कमलाकर जेजुरकर आणि त्याची पत्नी रुपाली पंडित जेजुरकर यांना देखील ताब्यात घेत त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

अहमदनगर लाईव्ह 24