विक्रमसिंह पाचपुते वडिलांना निवडून आणण्यासाठी उतरले मैदानात !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

श्रीगोंदे :- माजी मात्री बबनराव पाचपुते यांचे चिरंजीव विक्रमसिंह पाचपुते हे वडील बबनरावांना निवडून आणण्यासाठी मैदानात उतरले आहेत.

श्रीगोंदे-नगर मतदारसंघात बबनराव पाचपुते, आमदार जगताप व अनुराधा नागवडे हे इच्छुक आहेत. पाचपुते हे भाजपचे उमेदवार मानले जातात. नागवडे व जगताप हे एकत्र येऊन एकच उमेदवार देणार जाहीर सभेत सांगत असले,

तरी भाजपची उमेदवारी मिळवण्यासाठी दोघे दीड महिन्यापासून प्रयत्न करत आहेत. भाजपच्या काही नेत्यांशी अजूनही त्यांचा संपर्क सुरू आहे. कमळासाठी जगताप-नागवडे मुंबईत तळ ठोकून आहेत.

तीन-चार दिवसांपूर्वी राजेंद्र व अनुराधा नागवडे यांनी माजी सहकार मंत्री व नुकतेच भाजपत प्रवेश केलेले हर्षवर्धन पाटील व लातूर येथील भाजपचे माजी मंत्री संभाजीराव निलंगेकर यांच्या माध्यमातून भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नड्डा यांची भेट पुण्यातील एका कार्यक्रमात घेतल्याचे समजते.

नागवडे यांनी मुख्यमंत्र्यांचीही भेट घेतली. मात्र, त्या भेटीचा तपशील समजू शकला नाही. त्यामुळे पाचपुते समर्थकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली, पण काही वेळातच पाचपुतेंना भाजपच्या बड्या नेत्याचा मेसेज आला,डोन्ट वरी… तुम्ही कामाला लागा. त्यामुळे पाचपुते समर्थकांमध्ये आनंदाचे वातावरण तयार झाले.

कमळ नेमके पाचपुतेंना मिळते की, नागवडे-जगताप यांना हे येत्या चार दिवसांत समजेल. नागवडे-जगताप यांना कमळ चिन्ह मिळाले नाही, तर ते कोणते चिन्ह घेतात आणि पाचपुते यांच्या विरोधात जगताप की नागवडे हे लढतात काही दिवसांत समजेल.

अहमदनगर लाईव्ह 24