नगराध्यक्षा अनुराधा आदिक यांच्याकडून राष्ट्रवादीच्या आमदारांचा सत्कार

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

श्रीरामपूर :- राष्ट्रवादी कॉंग्रेसने जिल्ह्यात सहा जागांवर विजय मिळवून पक्षाची जिल्ह्यात ताकद सिद्ध केल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसच्या श्रीरामपूरच्या नगराध्यक्षा अनुराधा आदिक यांनी या नवनिर्वाचित आमदारांचा सत्कार केला.

या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अकोल्यात डॉ. किरण लहामटे, कोपरगावात आशुतोष काळे, राहुरीत प्राजक्त तनपुरे, नगरमध्ये संग्राम जगताप, पारनेरमध्ये नीलेश लंके, तर नेवाशात राष्ट्रवादी पुरस्कृत शंकरराव गडाख विजयी झाले.

राष्ट्रवादी काँग्रेसने जिल्ह्यात घवघवीत यश मिळवल्याबद्दल श्रीरामपूरच्या नगराध्यक्षा अनुराधा आदिक यांनी आमदार आशुतोष काळे, प्राजक्त तनपुरे, संग्राम जगताप आदींचा घरी जाऊन सत्कार केला. 

अहमदनगर लाईव्ह 24