निवडणूक होताच पेट्रोल-डिझेल महाग!

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर पेट्रोल व डिझेल यांच्या किमतीत वाढ होत असून सामान्य माणसाला त्यामुळे काही दिलासा मिळालेला नाही.

सातत्याने चौथ्या दिवशीही पेट्रोल व डिझेल लिटरला अनुक्रमे १४ व ७ पैसे महागले आहे. गेल्या चार दिवसांमध्ये पेट्रोल प्रतिलिटरला ५० पैसे व डिझेल प्रतिलिटरला ४४ पैसे इतके महागले आहे.

रविवारी दिल्ली, मुंबई, कोलकाता व चेन्नई या चार महानगरांमध्ये पेट्रोलचा प्रतिलिटर दर अनुक्रमे ७१.६७ रुपये, ७७.२८ रुपये, ७३.७४ रुपये, ७४.३९ रुपये इतका होता,

तर डिझेलचा दर प्रतिलिटरला अनुक्रमे ६६.६४ रुपये, ६९.८२ रुपये, ६८.४० रुपये व ७०.४४ रुपये असा होता..

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24