कोरोनाच्या संसर्गापासून बचावासाठी मास्क गरजेचा आहे. आज घराबाहेर पडणाऱ्या माणसाच्या चेहऱ्यावर दिसतो. मात्र मास्क वापराची जनजागृती करीत असताना जाणविले की ग्रामस्तरावर मास्कचा मोठ्या प्रमाणावर तुटवडा आहे.
त्यामुळे तालुकास्तरावरुन बचत गटांना मास्क तयार करण्याचे काम देऊन त्यांची उपजीविका साधण्याचा सुवर्णमध्य जिल्हा परिषदेने साधला.
प्रबोधन करणाऱ्या वर्गाला मास्कची आवश्यकता :
कोरोनापासून बचाव कसा करावा याबाबत प्रबोधन करण्यासाठी जिल्ह्यात साडेतीन हजार आशा, ७३९ आरोग्य सेविका, ३२८ आरोग्य सेविका व ९ हजार १०६ अंगणवाडी सेविका कार्यरत आहेत.
या सर्वांना मास्क अत्यंत गरजेचे असल्याने स्वयंसहायता समूह बचत गटांकडून मास्क तयार करण्यात आले व बचतगटांनी देखील चांगला प्रतिसाद दिला.
तालुकानिहाय मास्कची विक्री व उत्पन्न :
जिल्ह्यातील १५ तालुक्यामध्ये निफाड तालुका अग्रेसर असून, या तालुक्यातील केवळ ११ बचतगटांनी ९३ हजार ८९० मास्कची विक्री करून ३ लाख ४४ हजार रुपये उत्पन्न मिळविले आहे.
या तालुक्याचे आमदार दिलीप बनकर यांनी बचतगटांना कापड व दोरा उपलब्ध करून त्यांना आवश्यक तो मोबदला दिला. तसेच नाशिक तालुक्यातील बचत गट उत्पन्न मिळविण्यात अग्रेसर असून,
२४ बचतगटांनी ५७ हजार मास्कची विक्री करून त्यातून ६ लाख ७९ हजार एवढे उत्पन्न मिळविले आहे. चांदवड तालुक्यात ८० हजार ३५० मास्कची विक्री झाली असून, त्याद्वारे ३ लाख ७८ हजाराचे उत्पन्न मिळविले आहे.
बागलाण तालुक्यात २७ हजार मास्कची विक्री झाली करून त्यातून तीन लाख ५० हजाराचे उत्पन्न मिळविले. देवळा तालुक्याने ७ हजार मास्कची विक्री करून त्यातून ४४ हजार ५५७ रुपयांचे उत्पन्न मिळविले आहे.
दिंडोरी तालुक्याने ३२ हजार १०० मास्कची निर्मिती करून ५ लाख ९३ हजाराचे उत्पन्न मिळविले आहे. इगतपुरी तालुक्याने १८ हजार ७७५ मास्कची विक्री करून त्यातून २ लाख ७३ हजाराचे उत्पन्न मिळविले आहे.
कळवण तालुक्यातील बचतगटाने ९ हजार ७५० मास्कची विक्री करून १ लाख ४८ हजाराचे उत्पन्न मिळविले आहे. मालेगाव तालुक्यात २२ हजार १८३ मास्कची विक्री करून त्यातून ३ लाख १८ हजाराचे उत्तन्न मिळविले आहे.
नांदगाव तालुक्याने २८ हजार ४६५ मास्कची विक्री केली असून त्यातून ४ लाख ७० हजार ९०० इतके उत्पन्न मिळविले आहे. पेठ तालुक्याने ७ हजार ८७० मास्कची विक्री करून १ लाख ३२ हजार इतके उत्पन्न मिळविले आहे.
सिन्नर तालुक्याने १७ हजार मास्कची विक्री करून २ लाख १६ हजार इतके उत्पन्न मिळविले आहे. सुरगाणा तालुक्याने ८ हजार ५५५ मास्कची विक्री करून १ लाख २१ हजार इतके उत्पन्न मिळविले आहे.
येवला तालुक्यातील बचतगटांनी १७ हजार ८६० मास्कची विक्री करून १ लाख ४१ हजार हजार इतके उत्पन्न मिळविले आहे. त्र्यंबकेश्वर तालुक्याने ६ हजार ४०० मास्कची विक्री करून ९० हजार ५०० रुपये इतके उत्पन्न मिळविले आहे.
लक्षणीय :