विविध सहकारी संस्थांमध्ये काम करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांची वेतन कपात करु नका

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

सातारा दि. २७ : कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी केंद्र व राज्य शासनाने संपूर्ण देशासह राज्यात लॉकडाऊन जाहीर केलेला आहे. लॉकडाऊनमुळे उद्योग, व्यवसायांबरोबर बँकेच्या तसेच पतसंस्थांच्या व्यवहारावरही  परिणाम झाला आहे. 

सहकारी बँकांनी तसेच पतसंस्थानी, विविध सहकारी संस्थांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांचे वेतन कपात करु नये त्यांना किमान वेतन द्यावे, असे आवाहन सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी केले आहे.

लॉकडाऊनमुळे उद्योग, व्यवसायांबरोबरच बँकेच्या तसेच पतसंस्थांच्या व्यवहारावरही  परिणाम झाला आहे. तरी राज्यातील सहकारी बँका पतसंस्था यांनी आपल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांचे वेतन कपात करु नये त्यांना किमान वेतन द्यावे.

राज्यातील विविध मार्केट कमिट्या सुरु आहेत या मार्केट कमिट्यांमधील अधिकारी व कामगारांचे वेतन कपात करु नये, असेही आवाहन सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी केले आहे.

अहमदनगर लाईव्ह 24