कोपरगाव :- साई दर्शन करून घराकडे निघालेल्या टेम्पो ट्रॅव्हलरला समोरून येणाऱ्या टेम्पोने जोरदार धडक दिली. यात 13 साई भक्त जखमी झाले असून यात 2 पुरुष व 11 महिला यांचा समावेश आहे.
हा अपघात शिर्डी नाशिक महामार्गावर खडकी नाला येथील वळणावर झाला. सर्व साई भक्त रत्नागिरी सावंतवाडी येथील आहेत. या सर्वांना उपचारासाठी शिर्डी येथील साई स्पेशालिटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
रत्नागिरी सावंतवाडी येथील साई भक्त बुधवारी ( 30) रोजी दुपारी शिर्डी येथून साई दर्शन घेऊन रत्नागिरी सावंतवाडीकडे टेम्पो ट्रॅव्हलरमधून निघाले होते.
त्याचवेळी अचानक शिर्डी नाशिक महामार्गावरील खडकी नाला या वळणार समोरून आलेल्या टेम्पोने जोराची धडक दिली. या भीषण अपघातात टेम्पो ट्रॅव्हलर मधील 13 साई भक्त प्रवासी जखमी झाले आहेत.