श्रीपाद छिंदम आता विधानसभा निवडणूक लढविणार ?

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर: छत्रपती शिवरायांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्यामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेला नगरसेवक श्रीपाद छिंदम आता पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे. श्रीपाद छिंदमने महाराष्ट्र विधानसभेची तयारी केली आहे. नगर जिल्हाधिकारी कार्यालयातून त्याने उमेदवारी अर्ज नेला आहे.

श्रीपाद छिंदमला कोणत्या पक्षाकडून उमेदवारी मिळणार हे अद्याप अस्पष्ट आहे. मात्र छिंदमने नगर महापालिका निवडणूक ज्याप्रमाणे अपक्ष लढून जिंकून दाखवली होती, तसंच विधानसभेची निवडणूकही अपक्ष लढण्याची तयारी छिंदमची आहे.

श्रीपाद छिंदम हा महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अत्यंत अश्लिल शब्द वापरुन आक्षेपार्ह बरळला होता. त्यावेळी सर्वच स्तरातून छिंदमवर टीका झाली.

शिवप्रेमींनी छिंदमला चोपही दिला होता. सुरक्षेसाठी नगरमधून छिंदमला बाहेर हलवण्यात आले होते. मात्र, काही दिवस लोटल्यानंतर छिंदम पुन्हा राजकारणात सक्रीय आहे.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24