खा. गांधींचे ते कृत्य म्हणजे निर्लज्जपणचा कळस !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर :- नगर अर्बन बँकेने २०१७-१८ या आर्थिक वर्षात टक्केवारी साठी अनेक नियमबाह्य कर्ज प्रकरणे मंजूर केल्यामुळे बँकेचा ढोबळ एनपीए तब्बल १६३ कोटीचा झाला.

वाढलेल्या एनपीए मुळे रिजर्व बँकेने लाभांश वाटपास मनाई केली त्यामुळे सभासदांचे तब्बल ३ कोटी ५० लाखांचे नुकसान झाले. त्यामुळे सभासदांची फसवणूक बँकेने केली आहे. असा आरोप माजी संचालक राजेंद्र गांधी यांनी पत्रकार परिषदेत केला आहे.

गांधी म्हणाले, नगर अर्बन बँकेचे अध्यक्षांनी नुकतीच पत्रकार परिषद घेऊन ३१ मार्च २०१० पर्यंतचे सभासदाना २५० रुपयांची ठेव पावती देण्याचे जाहीर केले.

आपण सभासदावर खुप मोठे उपकार केले या अविर्भावात मिठाई वाटुन आनंदोत्सव केल्याचे फोटो व व्हीडीओ त्यांचा प्रसिध्द झाला. तसेच याचा भव्य दिव्य कार्यकमाचे नियोजन केले आहे.

सोमवारी ( ४ मार्च) ला बँकेचे केडगाव शाखेत हा कार्यकम होत आहे.वास्तविक पाहता सभासदांचे शताब्दी भेट २०१० मध्येच देणे अपेक्षित होते.

व मागील संचालक मंडळाने तशी संपुर्ण तरतूद करुन ठेवली होती. व २०१० मध्ये सभासदांना २५० रुपये ठेव मिळणार होती.

परंतु दिलीप गांधी यांना ही रक्कम सभासंदाना वाटायची नव्हती. २०१० मध्ये बँक सुस्थितीत होती व रिजर्व बँकेची कोणतीही आडकाठी नव्हती व त्यावेळेस बँकेचा एन.पी.ए.फक्त ३० कोटी रुपये होता.

गांधी यांनी ही रक्कम जाणीवपुर्वक दाबुन ठेवली. व आता ९ वर्षानंतर केवळ सभासंदाचे लक्ष विचलित करणे साठी सभासदांची फसवणुक करत आहेत. बँकेत काही सभासदांचे १-१ लाखाचे जादा शेअर्स आहेत.

लाभांश न मिळालयामुळे त्यांचे तब्बल १५ हजारांचे नुकसान होणार आहे. गांधी त्यांना २५० रुपये देऊन खुप मोठा अविर्भाव करुन पेठे वाटत आहेत. लाखो रुपये खर्च करुन कार्यक्रम करीत आहेत. हा निर्लज्जपणचा कळस आहे. आम्ही या प्रवृत्तीचा निषेध करत आहोत.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24