कोपरगाव :- शहरातील सुभाषनगर व दत्तनगर भागातील तीन अल्पवयीन मुली शाळेत जातो, असे सांगून बाहेर पडल्या, त्या घरी परत आल्याच नाहीत. १ व २ मार्चला या घटना घडल्या आहेत.
एकाच कुटुंबातील दोन अल्पवयीन मुली पळून गेल्याचे समजते. सुभाषनगर येथील महिलेने दिलेल्या फिर्यादीत तिच्या १७ वर्षांच्या मुलीस अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेल्याचे म्हटले आहे. हेड कॉन्स्टेबल आर. पी. पुंड तपास करत आहेत.