सातारा दि. 30 : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर कोणीही उपाशी राहू नये म्हणून शिवराज हॉटेल, रहिमतपूर येथे शिवभोजन थाळी सुरु करण्यात आली आहे. या शिवभोजन केंद्राचे उद्धाटन आज पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी कोरेगावच्या प्रांताधिकारी किर्ती नलावडे, तहसीलदार शुभदा शिंदे, रहिमतपूर नगर परिषदेचे नगराध्यक्ष आनंदा कोरे, नगर परिषदेचे मुख्याधिकारी, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष सुनिल माने, अविनाश माने, वासुदेव माने आदी उपस्थित होते.
गरजू व गरीब लोकांसाठी शिवभोजन थाळी 5 रुपयांमध्ये उपलब्ध करुन देण्यात येत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिवभोजन थाळीचा लाभ घेतना सुरक्षित अंतर ठेवावे, असे आवाहन पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी केले आहे.