अहमदनगर ब्रेकिंग : घरात घुसून महिलेवर बलात्कार

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

श्रीरामपूर :- शहरात रमानगर परिसरात राहणारी एक ३२ वर्षांची महिला तिच्या घरी असताना आरोपी विलास मायकल सिनगारे हा अनाधिकाराने घरात घुसला, दरवाजाची आतून कडी लावून महिलेला धरून तिच्याशी लगट करू लागला.

महिलेने विरोध करताच चापटीने मारून, शिवीगाळ करून तुझ्या मुलाला व आईला जीवे ठार मारेन अशी धमकी देवून तिच्या इच्छेविरूद्ध वेळोवेळी बलात्कार केला.

अत्याचारपिडीत तरूण महिलेने काल याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीसात फिर्याद दिल्यावरून आरोपी विलास मायकल सिनगारे, रा. रमानगर, श्रीरामपूर, ता. श्रीरामपूर याच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24