यशवंतराव गडाख यांनी ‘जे’ केलं ‘ते’ जिल्ह्यातील बाकी साखरसम्राटांना जमेल का ?

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- ज्येष्ठ नेते व साहित्यिक यशवंतराव गडाख यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी वैयक्तिक म्हणून पाच लाखांची मदत जाहीर केली आहे.या रकमेचा धनादेश त्यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या खात्यावर जमा केला आहे.

करोना या व्हायरसच्या आजाराशी लढण्यासाठी सरकारला मोठ्या निधीची गरज लागणार आहे. त्यासाठी महाराष्ट्रातील जनतेने मुख्यमंत्री निधीसाठी यथाशक्ती मदत करण्याचे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल केले होते. करोनामुळे सगळे उद्योग व्यवसाय ठप्प झाले आहेत.

करोडो हातांची रोजीरोटी हिरावली गेली आहे. त्यामुळे अनेक कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. मोठ्या संख्येने लोक स्वत:चे गाव सोडून इतर भागात अडकून पडले आहेत. त्यांच्या पोटापाण्याची व खुशालीची मोठी समस्या उभी राहिली आहे,

अशा सर्व गरजूंना हातभार म्हणून या निधीचा वापर व्हावा’ अशी अपेक्षा यशवंतराव गडाख यांनी व्यक्त केली. तसेच गरज लागेल तेंव्हा आपल्या सर्वांनाच अजूनही त्या निधीत भर टाकावी लागणार आहे असेही ते म्हणाले.

दरम्यान यशवंतराव गडाख यांच्या व्यतिरिक्त जिल्ह्यातील एकही साखर सम्राट आमदार वा माजी आमदार यांनी अश्या पध्दतीने संकटाच्या काळात पुढे येत कोरोना ग्रस्तांसाठी मदतीस आपला हातभार लावलेला नाही,जिल्ह्यातील एकाही नेत्याने अद्यापही मदत जाहीर केली नाही.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर

This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

No1 News Network Of Ahmednagar™

जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com

 

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24