संगमनेर | भाजप विधिमंडळाच्या नेता निवडीसाठी केंद्रीय कृषिमंत्री राज्याच्या दौऱ्यावर आले आहेत. आल्यासरशी त्यांनी पावसाने झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी शेतात जात शेतकऱ्यांना तत्काळ मदत द्यावी, असा टोमणा युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी मारला.
केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांना उद्देशून तांबे यांनी आपल्या टि्वटर आणि फेसबुकवर हात जोडत आणि पाया पडत ही मागणी केली. मागणी मान्य करुन घेण्यासाठी आमच्याकडे आंदोलनाचाही मार्ग आहे, हे सांगण्यास ते विसरले नाहीत.
कृषिमंत्र्यांनी कृपया परतीच्या पावसाने प्रचंड नुकसान झालेल्या शेतांना आणि शेतकऱ्यांना भेटी द्यावी, तसेच भेटीअंती तत्काळ मदतदेखील द्यावी, असे नमूद करत नुकसानीचे फोटोदेखील तांबे यांनी फेसबुकवर टाकले आहेत.