संपन्न महाराष्ट्र घडविणार

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

मुंबई : महात्मा जोतिबा फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, स्वातंत्र्यवीर सावरकर यांना भारतरत्न पुरस्कार मिळावा, यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा, राज्याची अर्थव्यवस्था १ ट्रिलियन डॉलर करून पाच वर्षांत १ कोटी लोकांना रोजगार,

वॉटरग्रीडच्या माध्यमा तून मराठवाड्यासह संपूर्ण महाराष्ट्र दुष्काळमुक्त करणे, शेतकऱ्यांना सौरऊर्जेच्या माध्यमातून दिवसा अखंडित १२ तास वीज, पायाभूत सुविधांत ५ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक, २०२२ पर्यंत सर्व बेघरांना घर इत्यादी घोषणांचा पाऊस पाडणारे भाजपाचा जाहीरनामा म्हणजेच संकल्पपत्र जाहीर करण्यात आले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या वेळी राज्यातील सर्व समाजघटकांना सोबत घेत संपन्न महाराष्ट्र घडवण्याचा आपला पुढची पाच वर्षे प्रयत्न राहणार असल्याचे सांगितले.वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात भाजपाच्या संकल्पपत्राचे प्रकाशन करण्यात आले.

भाजपाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जे.पी. नड्डा, राष्ट्रीय महासचिव सरोज पांडे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, मुंबई अध्यक्ष मंगलप्रभात लोढा आदी यावेळी उपस्थित होते.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24