उद्या शरद पवार घेणार सोनिया गांधी यांची भेट

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे सोमवार, ४ नोव्हेंबरला दिल्लीत जाऊन काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांची भेट घेणार आहेत. या भेटीनंतरच पुढच्या घडामोडींना वेग येईल, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे विधिमंडळ नेते अजित पवार यांनी दिली आहे.

अवकाळी पावसाच्या नुकसानभरपाईसाठी राज्य सरकारने दिलेली १० हजार कोटी रुपयांची मदत तुटपुंजी असून २५ हजार कोटींची मदत अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना देण्यात यावी व संपूर्ण पीककर्ज माफ करावे, अशी मागणीही त्यांनी केली.

शनिवारी शरद पवार यांच्या निवासस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. त्यानंतर बैठकीची माहिती देताना अजित पवार बोलत होते. या बैठकीला शरद पवार यांच्यासह अजित पवार, जयंत पाटील, प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, धनंजय मुंडे आदी उपस्थित होते.

अहमदनगर लाईव्ह 24