शेवगाव : पक्ष कोणता असेल ते आपण नंतर पाहू, परंतू जर तुम्ही आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहत असाल तर विधानसभा निवडणुकीमध्ये सौ. हर्षदा काकडे उभ्या राहतील.
निवडणूक लढवायची की नाही, हे तुम्ही तालुक्यातील घराघरांत जाऊन विचारा.सर्वसामान्य जनतेच्या जीवावरच यापूर्वी आम्ही निवडून आलो आहोत,
व यापुढेही जनतेच्या जीवावरच निवडणूक करू, असे प्रतिपादन जनशक्ती विकास आघाडीचे अध्यक्ष ॲड. शिवाजीराव काकडे यांनी शेवगाव येथे केले.
कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ॲड. काकडे बोलत होते. याप्रसंगी कार्यकर्ते व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.