७० वर्षांत जे पक्ष सत्तेत होते, त्यांनी विकास का केला नाही ?

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

बीड : वंचित, ओबीसी बांधवांना मोदी सरकारच्या काळात संवैधानिक दर्जा मिळाला. त्यामुळे हा घटक विकासाच्या मुख्य प्रवाहात आला आहे. ७० वर्षांत जे पक्ष सत्तेत होते, त्यांनी विकास का केला नाही? असा सवाल भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी केला.

संत भगवान बाबा व लोकनेते गोपीनाथ मुंडे यांनी ऊसतोड मजुरांच्या कल्याणाचा सतत विचार केला. भाजप सरकार त्यांच्याच विचारांवर कारभार करत असल्याचे सांगून विधानसभा निवडणुकीचे रणशिंग त्यांनी फुंकले.

संत भगवान बाबा यांची जन्मभूमी असलेल्या सावरगाव घाट (ता.पाटोदा) येथे मंगळवारी (दि.८) दसरा मेळावा उत्साहात पार पडला. या मेळाव्यास अमित शहा यांनी संबोधित केले.

यावेळी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, भूपेंद्र यादव, विजय पुराणिक, पालकमंत्री पंकजा मुंडे, मंत्री जयदत्त क्षीरसागर, महादेव जानकर, राम शिंदे, राधाकृष्ण विखे पाटील, ओमराजे निंबाळकर, सुजय विखे पाटील यांच्यासह बीड व अहमदगनर जिल्ह्यातील पदाधिकारी उपस्थित होते.

अहमदनगर लाईव्ह 24