आमदार बाळासाहेब थोरात होणार विधानसभेचे हंगामी अध्यक्ष ?

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

मुंबई :- राज्यात निवडून आलेल्या २८८ आमदारांना विधानसभा सदस्यत्वाची शपथ देण्याचा मान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांना मिळण्याची शक्यता आहे. 

नव्या विधानसभेत हंगामी अध्यक्षपदी सभागृहातील सर्वात ज्येष्ठ सदस्याच्या निवडीची प्रथा असते ज्येष्ठ आमदारांच्या नावांची यादी विधिमंडळ सचिवालय राज्यपालांना सादर करते व त्यानंतर ते हंगामी अध्यक्षांच्या नावाची निवड करतात. 

१४ व्या विधानसभेतील १० ज्येष्ठ सदस्यांची यादी सचिवालयाने शुक्रवारी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना सादर केली. त्यामध्ये सर्वाधिक ज्येष्ठ म्हणून काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांचे नाव पहिल्या क्रमांकावर आहे. 

त्यानंतर राष्ट्रवादीचे दिलीप वळसे-पाटील सात वेळा, राष्ट्रवादीचे अजित पवार व भाजपचे बबनराव पाचपुते, राष्ट्रवादीचे जयंत पाटील, भाजपचे कालिदास कोळंबकर, काँग्रेसचे के. सी. पाडवी हेही सातव्यांदा विधानसभेत आले आहेत. 

भाजपचे आमदार व माजी अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांची या वेळी सहावी टर्म आहे. तसेच राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ आणि भाजपचे आमदार राधाकृष्ण विखे पाटील सहाव्यांदा विधानसभेत येत आहेत.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24