मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडून शिकण्यासारखे खूप काही आहे. ते माझ्या आजोबांचे मित्र होते. शरद पवार यांनी सातारा येथे भरपावसात जी सभा घेतली ते खरेच कौतुक करण्यासारखे असल्याचे गौरवोद्गार युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी काढले आहेत.
भाजपा असेल वा शिवसेना सध्या निवडणुकांच्या प्रचारात राष्ट्रवादी काँग्रेसलाच दोन्ही पक्षांनी व त्यांच्या नेत्यांनी लक्ष्य केले आहे. खुद्द शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका करत आहेत. मात्र आदित्य ठाकरे यांनी शरद पवार यांचे कौतुक केले आहे.
आदित्य ठाकरे यांनी धारावी येथे रोड शो केला. त्या वेळी त्यांनी प्रतिक्रिया देताना शरद पवार यांचे कौतुक केले.