‘काँग्रेसने सावरकरांवर सतत अन्याय केला’

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

चंद्रपूर : स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर हे देशभक्त होते. त्यांच्या देशभक्तीवर शंका नाही. मात्र, स्वातंत्र्यप्राप्तीनंतर काँग्रेसने त्यांच्यावर सतत अन्याय केल्याचा आरोप भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते शाहनवाज हुसेन यांनी मंगळवारी चंद्रपुरात पत्रकारांशी बोलताना केला.

सावरकरांना ‘भारतरत्न’ देण्याची मागणी पुढे आली तर काँग्रेसचे नेते अस्वस्थ व्हायला लागतात. यामागील कारण अद्याप कळालेले नाही. स्वातंत्र्यप्राप्तीसाठी दोनदा शिक्षा भोगणारे सावरकर हे एकमेव नेते होते.

मात्र, काँग्रेसने त्यांच्यावर सतत अन्याय केला. आता स्वातंत्र्यवीर सावरकर यांना मरणोपरांत न्याय मिळेल, असे शाहनवाज हुसेन यांनी सांगितले. जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० हटवण्यात आल्यानंतर तेथील शांतता भंग होऊ नये म्हणून माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला आणि मेहबुबा मुफ्ती यांना नजरकैदेत ठेवण्यात आले आहे.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24