राहाता : तालुक्यातील शिर्डी परिसरातील निमगाव कोऱ्हाळे, निमशेवडी, नांदुर्खी, सावळीविहीर, तिसगाव, चोळकेवाडी, अस्तगाव या सात गावांत मोठ्या प्रमाणावर गुलाब शेती केली जाते.
या गुलाबाला जशी शिर्डी शहरात मागणी असते, तशी महाराष्ट्रासह गुजरात राज्यातदेखील चांगली मागणी झाली आहे. शिर्डी शहरात काही शेतकरी जागेवर गुलाबाची फुले विकत आहेत.
त्या व्यतिरिक्त सुमारे दोन लाख गुलाबाचे पॅकेट रोज बाहेरच्या राज्यात जातात. एका पॅकेटमध्ये १०० गुलाब असतात.
त्याला ५० रुपये बॅग या भावाने कधी दिवसाआड तर कधी १५ दिवसांनी व्यापारी पैसे देत असतात, अशी माहिती निमगाव कोऱ्हाळे गावात असलेल्या निमशेवडी येथील गुलाब उत्पादक अमोल चांगदेव गाडेकर यांनी दिली.