कार अपघातात एक जखमी

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

राजुरी : बाभळेश्वर-लोणी रोडवरील प्रवरा कारखान्याकडे जाणाऱ्या रोडजवळ असणाऱ्या म्हसोबा मंदिराजवळ रात्री वळणाचा अंदाज न आल्याने कार कठड्याला जाऊन आदळली. या अपघातात एकजण जखमी झाला आहे.

लोणीकडून बाभळेश्वरकडे जात असणाऱ्या कारमधील चालकाला म्हसोबा मंदिराजवळील वळणाचा अंदाज आला नाही. त्यामुळे कार ओढ्याच्या कठड्याला जोरात धडकली. शेजारी असणाऱ्या रहिवाशांनी जखमी चालकाला प्रवरा हॉस्पिटलला नेण्यात आले आहे.

इतर व्यक्ती किरकोळ जखमी झाले असून कारची पुढची बाजू पूर्ण चेपली आहे. म्हसोबा मंदिराजवळ वळणावर स्पिडब्रेकर बसवावेत किंवा सिग्नल बसविण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.

अहमदनगर लाईव्ह 24