राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या घड्याळाचे काटे बंद पडले – उद्धव ठाकरे

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

इस्लामपूर : राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या घड्याळाचे काटे बंद पडले आहेत. त्यांचे आता काही काम उरलेले नाही, असे राष्ट्रवादीवर टीकास्त्र सोडत शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरेंनी गद्दारांना महायुतीत थारा न देण्याचा निर्धार व्यक्त केला.

राज्याच्या भल्यासाठी महायुतीची घोषणा केली. पण उमेदवारी मिळाली नाही, म्हणून महायुतीची साथ सोडणाऱ्या बांडगुळांना पुन्हा महायुतीत प्रवेश देणार नाही.

यासाठी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार असल्याचे स्पष्ट करत, उध्दव ठाकरेंनी येथील यल्लमा चौकात महायुतीने सत्तेत आल्यानंतर कामे केली म्हणूनच धनगर, मुस्लिम समाज युतीसोबत असल्याचा दावा केला.

अस्थिर सरकारला शिवसेनेने स्थिर केले, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर रान उठवले. याउलट काँग्रेस-राष्ट्रवादीने तुंबड्या भरायचे काम केले, असा टोला ठाकरे यांनी लगावला.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24