श्रीरामपुरात उंदिर उड्या, सभेला विखेंच्या; कार्यालयात ससाणेंच्या

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

श्रीरामपूर  – श्रीरामपूर विधानसभा निवडणुकीचा प्रचार अंतिम टण्यात आला असून श्रीरामपुरात दोन्ही उमेदवारांकडे असणारे कार्यकर्ते हे ना. विखे यांना मानणारे आहे. ‘नेता एक, कार्यकर्ता अनेक’ अशी परिस्थिती श्रीरामपूरची झाल्याने या ठिकाणी आता निवडणकीत’उंदिर उड्या’ पहायला मिळत आहेत.

परवाच भाऊसाहेब कांबळे यांच्या प्रचारार्थ असलेल्या तालुक्यातील विखे यांच्या एका सभेत एका मोठ्या नेत्याने हजेरी लावली. हा नेता विखेंना आपला नेता मानतो.म्हणून विखेंच्या व्यासपीठावर हा नेता गेला.

मात्र पुन्हा काँग्रेसचे उमेदवार लहू कानडे यांच्याप्रचाराची यंत्रणा जेथून हलते त्या ससाणे यांच्या कार्यालयात आज हे नेते पुन्हा दिसले. आपण गटसोडलाच नाही, फक्त ना. विखे आले म्हणून आपण गेलो, असे त्यांचे म्हणणे असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे श्रीरामपुरात येत्या काही दिवसात अशाच प्रकारच्या ‘माकड उड्या’ पहावयास मिळण्याची शक्यता आहे.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24