मुंबई :- विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे चिरंजीव सुजय विखे हे भाजपमध्ये जाणार असल्याचं स्पष्ट झालं आहे.
गेल्या काही दिवसांपासून सुजय विखे हे भाजपमध्ये जाण्याच्या चर्चा सुरू आहेत. त्यावर आता शिक्कामोर्तब झाल्याचं सांगण्यात आहे.
भाजपमधून तिकीट मिळावं यासाठी सुजय विखे प्रयत्नशील होते. यासंदर्भात भाजपचे गिरीश महाजन आणि सुजय विखे यांच्यामध्ये काल बैठक झाली आहे.
त्यामुळे सुजय यांना भाजपमधून तिकीट मिळणार हे आता निश्चित झाल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.
राष्ट्रवादीतून सुजय यांना तिकीट मिळणार नाही हे नकळत का होईन पवारांनी स्पष्ट केलं. काँग्रेसमधूनही त्यांना उमेदवारी देणं शक्य नाही.
त्यामुळे आता भाजपमधून तिकीट मिळणं हाच एक पर्याय सुजय विखे यांच्यासमोर होता.