मुंबई :- ईडीची पीडा टळो म्हणून राधाकृष्ण विखे पाटील यांनी सुजयला भाजपात पाठवला का? असा टोला शिवसेना प्रवक्ता डॉ. मनीषा कायंदे यांनी लगावला आहे.
विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे चिरंजीव सुजय विखे पाटील हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.
त्यामुळे यावर आता राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू आहे. ‘राधाकृष्ण विखे पाटील यांनी त्यांच्यावरील आणि त्यांच्या परिवारावरील ईडीची कारवाई थांबवण्यासाठी सुजय यांना भाजपमध्ये पाठवलं का? अशी टीका शिवसेनेकडून करण्यात आली आहे.
त्या पुढे म्हणाल्या की, ‘सध्या सुजय भाजप नेते गिरीश महाजन यांच्याशी चर्चा करत आहेत अशी बातमी आली म्हणून विचारलं’ असाही टोला शिवसेना प्रवक्ता आमदार डॉ. मनीषा कायंदे यांनी लगावला.
‘तसंही राधाकृष्ण विखे पाटील विरोधी पक्षनेते कमी आणि शासनाचे दूत म्हणूनच कार्यरत होते. हे आपण गेले काही वर्ष अनुभवलं आहेच.
भाजप शासनाची विरोधी पक्ष नेत्यांनी मदत करण्यामागेही त्यांचा एक पाय भाजपत तर एक कॉंग्रेसमध्ये अशी अवस्था असण्यामागेही त्यांना आपल्यावर ईडीची करवाई होणार तर नाहीना अशी भीती वाटत असावी’ असंही त्या उपहासाने म्हणाल्या.