अहमदनगर :- मराठा सोयरीक ग्रुपने गेल्या साडेतीन वर्षांपासून प्रामाणिकपणे काम करून समाजाचा विश्वास संपादन केला आहे. अशोक कुटे सरांनी या कार्यात सातत्य ठेवल्याने हा ग्रुप टिकून राहिला आहे, असे उदगार मराठा सोयरीक ग्रुपच्या 40 व्या मोफत राज्यस्तरीय मेळाव्याप्रसंगी आ. संग्राम जगताप यांनी काढले.
अहमदनगर शहरात ’संजोग लॉनमध्ये मोफत अतिभव्य राज्यस्तरीय मराठा वधुवर थेटभेट मेळावा रविवार दि. 15 सप्टेंबर 2019 रोजी पार पडला. या सोयरीक ग्रुपने समाजाचा अवघड प्रश्न हाती घेऊन अतिशय कौतुकास्पद कार्य केले आहे. भविष्यात असे वधुवर मेळावे गरजेचे आहेत असे मत उद्घाटनाच्या अध्यक्ष स्थानावरून महापौर बाबासाहेब वाकळे यांनी मांडले.
आजच्या मेळाव्यात मुले 250 व मुली 160 अशी 410 वधूवरांची मोफत नावनोंदणी झाल्याने आतापर्यंतचा हा सर्वात मोठा मोफत मेळावा झाल्याचे ग्रुपचे सर्वेसर्वा अशोक कुटे सरांनी सांगितले. मेळाव्यात 8 लग्न जुळण्याच्या मार्गावर आहेत असे त्यांनी सांगितले.
या मेळाव्याचे उदघाटन महापौर बाबासाहेब वाकळे, धर्मादाय उपायुक्त मा. सौ. हिराताई शेळके व उपस्थित वधूंच्या हस्ते झाले. यावेळी जिजाऊ ब्रिगेडच्या अ. नगर जिल्हाध्यक्षा व ग्रुपच्या संचालिका जयश्री कुटे, मधुकर निकम, विठ्ठलराव गुंजाळ, अमोल सुरसे, हरिभाऊ जगताप, ग्रुपचे मुख्य संचालक अशोक कुटे, उदय अनुभुले, गणेश लंघे, लायन्स क्लबच्या प्रांतपाल छायाताई रजपूत आदी मान्यवर उपस्थित होते.
मुंबईहून आलेल्या संदीप जगताप या वराने मोफत मेळावा, मोफत चहा नाष्टा, मेळाव्याचे सर्व चोख नियोजन याबाबत आयोजकांना धन्यवाद दिले. मेळाव्यास ज्यांना येता आले नाही त्यांनी ओम गार्डन, सक्कर चौक या नगर शहरातील कार्यालयात 8847724680 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन संयोजकांनी केले आहे.
जयश्री कुटे व अशोक कुटे या दाम्पत्याच्या सामाजिक कार्यामुळे लायन्स क्लब तर्फे प्रांतपाल अध्यक्ष छायाताई रजपूत व जिजाऊ ब्रिगेड शहर अध्यक्ष सुरेखा कडूस यांच्या वतीने या दाम्पत्याचा विशेष सत्कार करण्यात आला. या मेळाव्यासाठी मुंबई, सांगली, सातारा, पुणे, नाशिक, बीड, औरंगाबाद, जालना, परभणी असे राज्यभरातून वधुवर पालकांनी हजेरी लावली.
बायोडाटे वाचनाचे महत्त्वाचे काम अरुण कडूस व विजय दळवी यांनी केले. प्रभावी सूत्रसंचालन रेवणनाथ पवार, प्रास्ताविक संचालक अशोक कुटे सर, आभार बाळासाहेब निमसे सरानी मानले. हा मेळावा यशस्वी करण्यासाठी मराठा पतसंस्थेचे व्हा. चेअरमन सतीश इंगळे, संचालक उदय अनुभुले, अरुण कडूस सर, सोमनाथ गायकवाड, व्यवस्थापक अंजली पठारे, हरिभाऊ जगताप, राजेंद्र औताडे, मीनाक्षी वाघस्कर, रावसाहेब घुमरे, इ. अनेक सदस्यांनी परिश्रम घेतले.