निवडणुकीच्या तोंडावर नेत्यांच्या अडचणीत वाढ

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

मुंबई : महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेतील २५ हजार कोटी रुपयांच्या घोटाळा प्रकरणी एकूण दीडशेच्या वर साक्षीदार साक्ष देण्यास तयार झाले असून सध्या त्यांच्या जबान्या नोंदवून घेण्याचे काम पोलीस अधिकारी करीत आहेत.

हे साक्षीदार या बँकेचे घटक असून त्यांनीच बँकेच्या वतीने ग्रामीण भागातील अनेकांना कर्जाचे वाटप केले होते. कोणाकोणाला या कर्जाची रक्कम मिळाली, याचाही शोध पोलीस घेत आहेत. या साक्षीदारांचे जाबजबाब नोंदवून घेतल्यानंतर या प्रकरणातील प्रमुख आरोपींना चौकशीसाठी बोलावले जाणार आहे.

आरोपींत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, शेकापचे नेते जयंत पाटील, शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ आदी बड्या नेत्यांचा समावेश आहे. या भ्रष्टाचाराची व्याप्ती मोठी असल्यामुळे त्याचा तपास मुंबई अन्वेषण विभागाच्या आर्थिक घोटाळा शाखेचे अधिकारी करीत आहेत.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24