नवी दिल्ली : सौदी अरेबियामधील तेल प्रकल्पावर हल्ल्यानंतर जगभरात खनिज तेलाचा तुटवडा निर्माण झाला आहे. जागतिक बाजारात तेलाची टंचाई भेडसावत असतानाच सलग सहाव्या दिवशी देशात इंधनाच्या दरात वाढ झाली आहे.

मुंबईत २९ पैशांनी पेट्रोल महागले असले तरी मागील सहा दिवसांत ही वाढ १.३१ रुपयांनी झाली आहे, तर डिझेल देखील २५ पैशांनी महागले आहे. मागील सहा दिवसांपासून डिझेलच्या दरात तब्बल १.१८ रुपयांनी वाढ झाली आहे.

अहमदनगर लाईव्ह 24