बाळासाहेब थोरात म्हणतात राज्यातील अनेक नेते संपर्कात, लवकरच त्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

संगमनेर :- काँग्रेस पक्ष निवडणुकांना सामोरे जाण्यासाठी तयार आहे. आमच्या उमदेवारांची निश्चित झाली असून यादी लवकरचा जाहीर केली जाईल. राज्यातील प्रचारामध्ये राहुल गांधी, सोनिया गांधी, प्रियंका गांधी यांनी देखील उतरावे, असा कार्यकर्त्यांनी प्रदेशाध्यक्ष आ. बाळासाहेब थोरात यांच्याकडे आग्रह धरला आहे. मात्र, आपण चर्चा करू, अशी ग्वाही आ. थोरात यांनी कार्यकर्त्यांना दिली आहे.

काँग्रेसमधून काही लोक सत्ताधारी पक्षात गेले. आता त्यांच्या पक्षातील लोक आम च्याकडे येण्यासाठी उत्सुक आहेत. त्यामुळे आमच्या उमेदवारांची यादी जाहीर करू नक असा त्यांचा सुर आहे. राज्यातील अनेक नेते संपर्कात असून लवकरच त्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश होईल, असा दावाही आग्रह आहे. मात्र त्यांची जर आवश्यकता असेल तर याबाबत त्यांच्याशी चर्चा करुन त्यांना येण्यासाठी आग्रह केला जाईल, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ. बाळासाहेब थोरात यांनी केला.

प्रदेशाध्यक्ष थोरात शनिवारी संगमनेरमध्ये पत्रकारांशी बोलताना म्हणाले, गेली. पाच वर्षात काँग्रेसचे काम राज्यात सुरू होते आम्हीही सरकारच्या अपयशाविरोधात दोन यात्रा काढल्या. अनेक प्रश्नांवरुन आंदोलने केली. सध्याच्या सरकारकडे एक अपयशी सरकार म्हणून बघीत जात आहे. जनतेत सरकारविरोधात नाराजी आहे. राज्यातील शेतकऱ्यांचे प्रश्नदेखील तसेच प्रलंबित आहेत. युवकांच्या रोजगाराचा प्रश्न तसाच असून युवकांना नोकऱ्या मिळत नाहीत. त्यामुळे या निवडणुकीमध्ये जनता नक्कीच आमच्या बरोबर राहील.

काँग्रेस पक्षातून अनेक जण गेलेत, मात्र काल पर्यंत पक्षात येणाऱ्यांचा आमच्याशी संपर्क नव्हता. मात्र, शनिवारी सकाळ पासून अनेकांचे फोन येत आहेत. संपर्क केला जातोय , ही जागा जाहीर करू नका, ती जागा जाहीर करू नका, अशी मागणी केली जात आहे. त्यामुळे आता काँग्रेसमध्ये येण्यास अनेक जण इच्छुक आहेत. भाजप – शिवसेनेची युती होवो अथवा न होवो, आम्ही निवडणुका लढविण्यास तयार आहोत. त्यांच्या युती होण्याचा न होण्याचा आम्हाला काय फायदा – तोटा होईल याचा विचार आम्ही करीत नाही.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24