संगमनेर :- कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती सतिश कानवडे यांनी गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. त्यांच्या या निर्णयाने थोरात गटाला मोठा धक्का बसला असून, सतिश कानवडे यांचा पक्षातील प्रवेश हा तालुक्यातील परिवर्तनाची सुरुवात आहे असा विश्वास ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी यानिमित्ताने व्यक्त केला.
तर तालुक्यात प्रश्नांपासून काँग्रेस पक्ष दूर गेला कार्यकत्याऐवजी फक्त ठेकेदारांचाच सन्मान सुरु झाल्याने आपण काँग्रेस पक्षाचा त्याग केला असल्याची भूमिका सतिश कानवडे यांनी स्पष्ट केली.
संगमनेर येथे संपन्न झालेल्या या पक्षप्रवेशाप्रसंगी भाजपाचे तालुकाध्यक्ष काशिनाथ पावसे, शहराध्यक्ष राजेंद्र सांगळे, शिवसेना तालुका प्रमुख जनार्दन आहेर, शहरप्रमुख अमर कतारी, वसंतराव देशमुख, भाजपाच्या महिला जिल्हाध्यक्षा सौ. पुजा दिक्षीत,
साहेबराव नवले, बापूसाहेब गुळवे, डॉ. भानुदास डेरे सुदामराव सानप, राजेश चौधरी, राम जाज, बाबासाहेब कुटे, बुवाजी खेमनर, राजेंद्र देशमुख, संजय फड, यांच्यासह सेना – भाजपा मित्र पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपसिथत होते.
ना. विखे पाटील यांनी बुके आणि भाजपाचा झेंडा हातात देवून कानवडे यांचे पक्षात स्वागत केले. याप्रसंगी बोलताना ना. विखे पाटील म्हणाले, की पक्षामध्ये इनकमिंग बंद झाली हा काहींनी केलेला दावा सतिश कानवडे यांच्या प्रवेशाने खोटा ठरला असून,
तालुक्यातील संस्थांचे असंख्य पदाधिकारी पक्षामध्ये प्रवेश करण्यास इच्छुक आहेत. या नावांची यादी दिवसागणिक वाढत आहे. टप्प्याटप्प्याने या सर्वांचा प्रवेश पक्षामध्ये सन्मानाने केला जाईल.
असे स्पष्ट करुन त्यांनी सांगितले की, तालुक्यात सुरु झालेल्या परिवर्तनाच्या वातावरणात युवक आता सक्रीयतेने पुढे आले आहेत जिल्ह्यात १२ – ० चा इतिहास घडणार आहे. याची सुरुवात संगमनेरातून झाल्याने सतिश कानवडे यांचा प्रवेश हे उद्याच विजयाचे प्रतिक ठरेल अस विश्वास त्यांनी व्यक्त केला.
याप्रसंगी बोलताना, सतिश कानवडे यांनी तालुक्यातील प्रस्थापित व्यवस्थेवर कडक शब्दांत टिका केली. तळमळीच्य कार्यकर्त्यांना आज जाणिवपूर्वक बाजूला टाकले गेले आहे. केवळ ठेकेदारांचा सन्मान करुन त्यांना पदं दिली जात आहेत. तालुक्यात काँग्रेस पक्ष संघटना सामान्यांच्या प्रश्नांपासून दूर गेल्याने पक्षाचा जनाधारही घटला आहे.