संगमनेर : आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार स्व. यशवंतराव चव्हाण वारसदार म्हणून संपूर्ण राज्यात परिचित असलेले राज्याचे माजी महसूलमंत्री आ. बाळासाहेब थोरात यांना मानाचा उत्कृष्ट विधायक पुरस्कार जाहीर झाला आहे.
पुणे येथील ब्रम्हकेसरी सांस्कृतिक पत्रिकेच्या वतीने दिल्या जाणा-या या पुरस्कारासाठी यावर्षी आ. थोरात यांची निवड या संस्थेने केली आहे. राज्याच्या सामाजिक शैक्षणिक, क्रीडा, समाजकारण राजकारण, कृषी, सहकार अशा विविध क्षेत्रात आ. बाळासाहेब थोरात यांनी उल्लेखनीय आहे.
योगदान देताना राजकारणात विविध महत्त्वाची खाती सांभाळली आहेत. महसूल, कृषी, शिक्षण, जलसंधारण, रोहयो, राजशिष्टाचार, पाटबंधारे, खारजमीन, अशी विविध खाती सांभाळताना त्यांनी त्या खात्यांना लोकाभिमुख, पारदर्शी व गतिमान बनविले. हसतमुख, सहज काम मार्गी लावण्याची पद्धत, स्वच्छ व सुसंस्कृत प्रतिमा यामुळे राज्याच्या जनसामान्यांमध्ये आदराचे स्थान आ. बाळासाहेब थोरात यांनी निर्माण केले आहे.
आमदार बाळासाहेब थोरात यांनी आपल्या दूरदृष्टी नेतृत्वातून संगमनेर तालुका विकासाचे मॉडेल बनविले आहे. येथील सहकार, शिक्षण, शेती, दूध व्यवसाय, व्यापार, सांस्कृतिक व सामाजिक सलोखा राज्याल दिशादर्शक आहे.
प्रसिध्द न करता काम करणारे आ. थोरात यांचा विरोधकसुद्धा आदर करतात. यापूर्वी प्रतिष्ठेच्या अशा यशवंत वेणू पुरस्कार, कार्यक्षम आमदार अशा विविध पुरस्कारांनी त्यांचा सन्मान झाला आहे. रविवार दि. २३ जून २०१९ रोजी भोसरी येथील अंकुशराव लांडगे सभागृहात मान्यवरांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण होणार आहे.