लग्नाच्या बस्त्यासाठी जात असताना उपवराचा रेल्वे रुळात पाय अडकून जागीच मृत्यू

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

जळगाव – नुकतेच लग्न ठरले असल्याने लग्नाच्या बस्त्यासाठी येणाऱ्या पाहुण्यांना घेण्यासाठी गेलेल्या नशिराबादच्या तरुणाचा रेल्वे रुळामध्ये पाय अडकल्याने धावत्या रेल्वेखाली येवून मृत्यू झाला. 

ही घटना गरुवारी सायंकाळी असोदा रेल्वे स्थानकाजवळ घडली. अक्षय श्यामसुंदर मोरे (वय २३) असे मृत तरुणाचे नाव आहे.

शुक्रवारी तरुणाच्या लग्नाचा बस्ता जळगाव येथे भरण्याचे ठरले हाेते. त्यानमित्त ताे भादली येथून आत्याला आणण्यासाठी दुचाकीवर नशिराबाद येथून गेला हाेता. 

भादली रेल्वे स्थानकाजवळ त्याने दुचाकी लावली. तेथून रेल्वे रुळावरुन पायी जात असताना गुरुवारी सायंकाळी ५ वाजता त्याचा पाय रुळामध्ये अडकला.

त्याचवेळी समाेरून भुसावळकडे जात असलेली नवजीवन एक्स्प्रेस त्याच्या अंगावरुन गेली. त्यामुळे घटनास्थळीच त्याचा मृत्यू झाल्याचे प्रत्यक्षदर्शीने पोलिसांना सांगितले. 

नशिराबाद पाेलिसांनी मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात आणला. शुक्रवारी शाेकाकुल वातावरणात त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24