अहमदनगरकरांसाठी दिलासादायक बातमी ; त्यांचे रिपोर्ट्स आले निगेटिव्ह !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर :- जिल्ह्यातील तिसऱ्या कोरोना बाधित रुग्णाचे १४ दिवसानंतरचे दोन्ही अहवाल निगेटिव्ह आले आहे. त्यामुळे त्या व्यक्तीला आज घरी सोडण्यात येणार आहे.

दरम्यान जिल्हा सामान्य रुग्णालयाने पुणे येथील लष्करी वैद्यकीय महाविद्यालयाकडे कालपर्यंत १२२ व्यक्तींचे घशातील स्त्राव नमुने पाठविले होते.

त्यापैकी १०३ अहवाल प्राप्त झाले असून ते सर्व अहवाल निगेटीव्ह आले आहेत. त्यात या तिसऱ्या कोरोना बाधित व्यक्तीच्या अहवालाचा समावेश असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर

This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

अहमदनगर लाईव्ह 24