तुम्ही जिओ सिम कार्ड USE करत असाल तर, बदलत आहेत या गोष्टी, जाणून घ्या

Published by
अहमदनगर लाईव्ह 24
जिओ सिम कार्ड ने मार्केटमध्ये एन्ट्री घेताच अनेक मोठमोठ्या कंपन्यांना धक्का दिला होता. ज्यामध्ये एअरटेल, वोडाफोन, आयडिया अशा दिग्गज कंपन्यांचा समावेश होतो.
या कंपन्यांना जिओ मुळे खूप मोठे नुकसान सहन करावे लागले होते.जिओचा सगळ्यात जास्त खपणारा प्लॅन 399 चा आहे.
या प्लॅन नुसार ग्राहकांना 84 दिवसांसाठी अनलिमिटेड कॉल आणि प्रतिदिवस दीड जीबी डेटा दिला जातो. हा प्लॅनकडे ग्राहकांची सर्वात जास्त ओढ असल्याचे दिसून येत आहे.

 

मात्र आता हा प्लान महागण्याची चिन्हे आहेत या प्लॅन साठी तुम्हाला 10 ते 15 टक्के जास्त किंमत द्यावी लागू शकते.

काही दिवसांत यांची किंमत वाढून 450 ते 460 रुपये इतकी होऊ शकते. यावरून असे दिसून येते की जिओ सुद्धा आपल्या प्लॅनच्या किमतीमध्ये वाढ करत आहे असे दिसून येत आहे.

Entertainment News Updates

 

अहमदनगर लाईव्ह 24