भाजप सोडून या 5 पक्षांचा लोकसभा निवडणूक खर्च जाहीर, काँग्रेस- ८२० कोटी, राष्ट्रवादी-..

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

नवी दिल्ली : चालू वर्षात लोकसभा निवडणूक व त्यासोबत झालेल्या पाच राज्यांतील विधानसभा निवडणूक प्रचारासाठी काँग्रेसने ८२० कोटी रुपये खर्च केले.

निवडणुकीदरम्यान जमा केलेल्या ८५६ कोटींहून अधिक निधीतून हा खर्च करण्यात आल्याची माहिती काँग्रेसने निवडणूक आयोगाला दिली आहे.

तसेच  राष्ट्रीय राजकीय पक्षांनी सादर केलेल्या अहवालानुसार, राष्ट्रवादी काँग्रेसने ७२.३० कोटी रुपये, तृणमूल काँग्रेसने ८३.६० कोटी रुपये, बसपाने ५५.४० कोटी रुपये आणि माकपने ७३.१० कोटी रुपये निवडणुकीसाठी खर्च करण्यात आले.

मार्च महिन्यात १७ व्या लोकसभेसाठी सात टप्प्यांत सार्वत्रिक निवडणूक घेण्यात आली होती. त्याचवेळी आंध्र प्रदेश, अरुणाचल प्रदेश, तेलंगणा, ओडिशा व सिक्कीम या पाच राज्यांतील विधानसभेसाठीही निवडणुका झाल्या. या निवडणुकीवेळी केलेल्या जमा-खर्चाचा विस्तृत तपशील काँग्रेसने ३१ ऑक्टोबर रोजी निवडणूक आयोगासमोर सादर केला. 

अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे कोषाध्यक्ष अहमद पटेल यांची स्वाक्षरी असलेल्या या तपशिलानुसार, काँग्रेसने एकूण ८२० कोटी ९० लाख रुपये या निवडणुकीच्या प्रचारात ओतले. या खर्चातील ६२६ कोटी ३० लाख रुपये पक्षाच्या देशभरातील प्रत्यक्ष प्रचार कार्यासाठी खर्चण्यात आले. 

तर १९४ कोटी रुपये आपल्या निवडणूक उमेदवारांसाठी खर्च केल्याचे काँग्रेसने या तपशिलात नमूद केले आहे. यामध्ये स्टार प्रचारकांच्या प्रवासासाठी केलेला ८६.२० कोटींचा तसेच पोस्टरबाजीसाठी केलेल्या ४७ कोटी खर्चाचाही समावेश आहे. निवडणूक कार्यक्रम घोषित होण्यापासून ते निकालापर्यंत काँग्रेसने ८५६ कोटींचा निधी जमा केल्याचेही काँग्रेसने स्पष्ट केले आहे.

उल्लेखनीय बाब म्हणजे, गतवेळच्या तुलनेत काँग्रेसने यंदाच्या लोकसभा निवडणुकीपेक्षा अधिक खर्च केला. २०१४ साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने ५१४ कोटी खर्च केले होते. त्या तुलनेत गत लोकसभेवेळी भाजपने ७१४ कोटी रुपये खर्च केले होते. मात्र, यावेळी केलेल्या खर्चाचा तपशील अद्यापही भाजपने आयोगासमोर सादर केलेला नाही.

अहमदनगर लाईव्ह 24