पाचच महिन्यांपूर्वी लग्न झालेल्या तरुणाचा धक्कादायक मृत्यू

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

तीर्थपुरी –  एका सीड्स कंपनीत सेल्समन म्हणून कार्यरत असलेले आकाश जाधव (२४, राहेरा तांडा, ता. घनसावंगी) हे तीर्थपुरी येथे पत्नीसोबत भाड्याच्या घरात राहत होते. 

बुधवारी संध्याकाळी उशिरा घरी येऊन जेवण करून झोपी गेले होते. पहाटे पती झोपेतून उठत नसल्याने पत्नीने हलवून पाहिले असता ते जागे होत नसल्याने पत्नीने शेजारच्यांना उठवून पतीला दवाखान्यात अंबडला नेले होते. 

तेथे डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. आकाश जाधवचा पाच महिन्यांपूर्वी प्रेमविवाह झाला होता. आकाश जाधवचा अचानक मृत्यू झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. अंबडच्या उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24