बेरोजगारीला कंटाळून डीएड झालेल्या तरुणाची विहिरीत उडी

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

जळगाव सपकाळ – उच्च शिक्षण घेऊनही नोकरी मिळत नसल्यामुळे बेरोजगार असलेल्या तरुणाने विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याची घटना भोकरदन तालुक्यातील जळगाव सपकाळ येथे मंगळवारी उघडकीस आली. गणेश नामदेव सपकाळ (३२) असे मृत तरुणाचे नाव आहे.

जळगाव सपकाळ येथील गणेश सपकाळ यांचे शिक्षण डीएड पर्यत झालेले आहे. त्यांच्या घरची परिस्थिती हलाखीची असल्याने नोकरी मिळवण्यासाठी त्यांचा प्रयत्न सुरूच होता.
परंतु, हलाखीची परिस्थिती, एक एकर शेतीमुळे ते नेहमी तणावाखाली राहायचे. घर खर्च भागावा म्हणून ते शिकवणी वर्ग घेत असे. दरम्यान सोमवारी कुणाला न सांगता ते घरातून निघून गेले होते.
नातेवाइकांनी त्यांचा शोध घेतला असता, शेतातील विहिरीत मंगळवारी त्यांचा मृतदेह दिसून आला.
अहमदनगर लाईव्ह 24