कोपरगाव – शहरात संजयनगर भागात राहणारा तरुण राहुल सोमनाथ गायकवाड याच्या घरासमोर येवून त्याच्या बहिणीकडे पाहून आरोपीने शिट्टी वाजवली,
तेव्हा शिट्टी का वाजवली असा जाब राहुल गायकवाड या तरुणाने विचारला असता त्याला ५ जणांनी बेदम मारहाण करत डोक्यात लोखंडी पहार मारुन डोके फोडले. लाथाबुक्क्याने मारहाण करुन शिवीगाळ करत जिवे ठार मारण्याची धमकी दिली.
जखमी राहुल गायकवाड, वय २० या तरुणाने वरीलप्रमाणे कोपरगाव शहर पोलिसांत फियांद दिल्यावरुन मारहाण करणारे आरोपी अमोल संपत रोठे, सोमनाथ संपत रोठे, मंगेश संपत रोठे, संपत रामा रोठे, लताबाई संपत रोठे, सर्व रा. संजयनगर, कोपरगाव यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
पोनि मानगावकर यांनी घटनास्थळी भेट दिली. पढील तपास हेकॉ तिकोणे हे करीत असल्याचे पोलीस सुत्रांनी सांगितले.