मुंबई – राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली असल्यामुळे राज्याची सर्व सूत्रे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हातात आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात काळजीवाहू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडील काळजीवाहू मुख्यमंत्रिपदाची जबाबदारीही आता संपलेली आहे.
ते आता माजी माजी मुख्यमंत्री झाले आहेत. त्याचं ट्विवटर हँडलवरच्या त्यांच्या नावापुढील ‘काळजीवाहू मुख्यमंत्री’ पद काढून ‘महाराष्ट्राचा सेवक’ सा उल्लेख केलाय.
राज्यातील सर्वात मोठा पक्ष असलेल्या भाजपने सरकार स्थापन करण्यास असमर्थता दर्शवली. यानंतर शिवसेनेला निमंत्रण मिळाले. मात्र सेनेला बहुमत सिद्ध करता आले नाही.
तर राष्ट्रवादीही सत्ता स्थापनेचा दावा करु शकली नाही. त्यामुळे राज्यपालांनी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची केंद्र सरकारला शिफारस केली. यानंतर केंद्राने महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची शिफारस करण्याची राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे पाठवली होती.
यानंतर कोविंद यांनी संध्याकाळी महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याच्या अध्यादेशावर सही केल्यानंतर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे.