पीएमसी खातेदाराला आता ५० हजार रुपये काढता येणार!

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

मुंबई :  पीएमसी बँकेच्या तरलतेच्या स्थितीचा आढावा घेतल्यानंतर तसेच बँकेची आपल्या खातेधारकांना पैसे देण्याची क्षमता तपासून पैसे काढण्याची मर्यादा ४०,००० रुपयांवरून ५०,००० रुपये करण्यास परवानगी देण्यात आली आहे. 

आरबीआयने या संदर्भात काढलेल्या आदेशात म्हटले आहे की, पीएमसी बँकेच्या तरलतेच्या स्थितीचा आढावा घेतल्यानंतर तसेच बँकेची आपल्या खातेधारकांना पैसे देण्याची क्षमता तपासून पैसे काढण्याची मर्यादा ४०,००० रुपयांवरून ५०,००० रुपये करण्यास परवानगी देण्यात आली आहे. 

आरबीआयच्या या नव्या आदेशानंतर आता बँकेच्या सुमारे ७८ टक्के खातेधारकांना आपल्या खात्यातून संपूर्ण रक्कम काढून घेता येणे शक्य होणार आहे. 

तसेच ही रोख काढताना अडचण येऊ नये यासाठी पीएमसी बँकेच्याच एटीएममधूनही ही ५०,००० रुपयांपर्यंतची रक्कम काढण्यासही परवानगी देण्यात आल्याचे आरबीआयने सांगितले आहे.

 पीएमसी बँकेच्या स्थितीचे आम्ही जवळून निरीक्षण करत असून भविष्यात खातेधारकांच्या पैशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाची पावले उचलेल, असेही आरबीआयने स्पष्ट केले आहे.

अहमदनगर लाईव्ह 24