मुंबई : ‘सर्वोच्च न्यायालयाचा हा आदेश म्हणजे कोणाचा विजय किंवा पराभव नाही. तर भारतीय आस्था मजबूत करणारा हा निर्णय आहे. मुळातच जवळजवळ सर्वानी या निर्णयाचे स्वागत केले आहे, असे विधान राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत केले.
ते मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. आज सकाळी सर्वोच्च न्यायालयाने राम जन्मभूमी आणि बाबरी मशीद वादावर ऐतिहासिक निकाल दिला.
अनेक दशकांपासून रखडलेल्या या वादावर तोडगा काढत न्यायालयानं केंद्र सरकारला कार्यवाही करण्याचे आदेश दिले. या निर्णयानंतर काळजीवाहू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत या निर्णयांचे स्वागत केले.
ते म्हणाले कि, सर्वांनी भारतभक्तीची भावना आपल्या मनात ठेवा.सबका साथ सबका विकास या संकल्पनेनुसार या नवा भारत घडवण्याचं काम केले पाहिजे. तसेच सर्वोच्च न्यायालयाचा हा आदेश म्हणजे कोणाचा विजय किंवा पराभव नाही.
तर भारतीय आस्था मजबूत करणारा हा निर्णय आहे. मुळातच जवळजवळ सर्वानी या निर्णयाचे स्वागत केले आहे. या निर्णयामुळे राज्यात अतिशय चांगले वातावरण आहे.