मुंबई-पुणे रोड – एचपी गॅस टँकरला स्वीफ्ट डिझायर कारनं मागून दिलेल्या जोरदार धडकेत 4 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर दोन जण गंभीर झाले आहेत.
2 गंभीर जखमी असलेल्या महिलांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. ही घटना मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर रिसवाडी रसायनी गावाजवळ पहाटे चार वाजण्याच्या सुमारास घडली आहे.
पहाटे 4 च्या सुमारास लग्न समारंभ आटपून हे साताऱ्याहून मुंबईला येत असताना हा अपघात झाला. स्वीफ्ट डिझायरमध्ये एकूण पाच महिला आणि एक पुरुष प्रवास करत होते.
यापैकी तीन महिला तर एक पुरुषाचा अपघातात जागेवरच मृत्यू झाला आहे तर एक महिला गंभीर जखमी झाली असून तिला उपचारासाठी एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
अपघातातील स्वीफ्ट गाडीवर पालवे तसेच मेटकरी या नावाचे लग्न संबंध असल्याचे स्टिकर लावण्यात आले होते. चालकाचं भरधाव कारवरील नियंत्रण सुटल्याने कार थेट गॅस टँकरला धडकली.
बोनेटसह कारचा चुराडा झाला. अपघातानंतर जवळपास अर्धा किलोमीटर अपघातग्रस्त वाहन टँकरने फरफटत नेल्याने मृतांचा आकडा अधिकच वाढला.