जनतेच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणार – आ. निलेश लंके

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर – नगर तालुक्यातील निंबळक, देहरे व वाळकी गटातील जनतेनी माझ्यावर विश्वास दाखवला असून मोठे मताधिक्य दिले. त्यांच्या विश्वासाला तडा जावू देणार नाही.

तालुक्याला स्वतंत्र आमदार नसल्याने संपूर्ण तालुक्यातील जनतेच्या अडचणीच्या काळात खंबीरपणे पाठीशी उभा राहणार आहे. जनतेला पोरकेपणा जाणवू देणार नाही असे आमदार निलेश लंके यांनी स्पष्ट केले.

नगर तालुका दुध संघाच्या नवनिर्वाचित संचालकांचा आ. लंके यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. यावेळी तालुक्यातील जनतेला हक्काचा आमदार नसल्याने पोरकेपणा वाटत आहे.

मात्र मी फक्त मतदारसंघाचा विचार न करता विकासाच्या दृष्टीने पूर्ण तालुक्याचा विचार करणार आहे. येथील जनतेनी दिलेल्या प्रेमाची उतराई आगामी काळात करणार आहे. जनतेच्या अडचणीच्या काळात पक्षभेद न करता धावून येणार आहे. त्यामुळे आपण पोरके झाले आहोत असा विचार जनतेनी बाजुला ठेवावा.

शेतकऱ्यांचे प्रश्न असो किंवा अन्य प्रश्न असो ते सोडविण्यासाठी मी सदैव आपल्या पाठीशी उभा राहणार आहे. तालुक्यातील जनतेला पोरकेपणा जाणवू देणार नाही, असा दिलासा आ. निलेश लंके यांनी तालुक्यातील जनतेला दिला. तालुका दुध संघाच्या नुतन संचालकांचा सत्कार आ. लंके यांच्या हस्ते करण्यात आला.

यावेळी अनिल करांडे, राम पानमळकर, रभाजी सुळ, अशोक झरेकर, संजय काळे, श्रीकांत जगदाळे, उद्धव अमृते, भाऊसाहेब काळे, राजाराम धामणे, मधुकर मगर, मोहन तवले, किसन बेरड, गुलाब कार्ले, रामदास शेळके, बजरंग पाडळकर, स्वप्नील बुलाखे, वैशाली मते, गोरक्षनाथ काळे, पुष्पा कोठुळे, गोरक्षनाथ पालवे उपस्थित होते.

अहमदनगर लाईव्ह 24