नागपूर : दारू पाजण्यास नकार दिल्यामुळे आरोपींनी दारूची शिशी फोडून युवकावर प्राणाघातक वार केल्याची घटना कोराडी भागात घडली.
पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली. आसिफ रहमान खान (२३, रा. जयभिमनगर, महादुला, कोराडी), असे जखमी युवकाचे नाव आहे.
कातंश्वेर भुसाडे (३१) आणि गुलशन भुसाडे (२८, दोन्ही रा. जयभिमनगर, मजदूर चौक, कोराडी) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. रविवारी रात्री ८.३० ते ११ यादरम्यान फिर्यादी आसिफ रहमान खान हा कोराडी हद्दीतील कांबळे नेट कॅफे दुकानासमोर, मजदूर चौकाच्या बाजूला, स्व्हिहस रोड समोर जात होता.
वस्तीत राहणारे आरोपी कातंश्वेर व गुलशन यांनी आसिफने दारू पाजण्यास नकार दिल्यामुळे संगनमतकरून त्याच्या डाव्या गालावर व गळ्यावर दारूची शिशी फोडून जिवानीशी ठार मारण्याचा प्रयत्न केला.