सत्तास्थापनेवर गडकरी दोन तासांत कोंडी फोडतील!

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

नागपूर : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकाल लागून १२ दिवस उलटून गेले असले तरी सत्तास्थापनेसाठी भाजपा आणि शिवसेनेमध्ये एकमत होऊ शकलेले नाही. मुख्यमंत्रीपद आणि महत्त्वाची खाती यावरून दोन्ही पक्ष अडून बसले आहेत. 

यातच,  विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपामधून शिवसेनेमध्ये दाखल झालेले शेतकरी संघटनेचे नेते किशोर तिवारी यांनी या पार्श्वभूमीवर सरसंघचालक मोहन भागवत यांना एक पत्र लिहिले.

या पत्रात ‘डेडलॉक’तोडण्यासाठी नितीन गडकरी यांची मदत घ्यावी, असा सल्ला दिला आहे. दरम्यान, मंगळवारी रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संघ मुख्यालयात सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट घेतली.

या पार्श्वभूमीवर तिवारी यांनी भागवत यांना पत्र लिहिले असून या राजकीय परिस्थितीकडे गांभीर्याने पाहण्याची विनंती केली आहे. 

त्याचवेळी ही राजकीय कोंडी फोडण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हाती जबाबदारी द्यावी, ते दोन तासांत ही कोंडी फोडतील, असे तिवारी यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे. 

अहमदनगर लाईव्ह 24