मुलगा होत नसल्याच्या वादातून पत्नीला जिवंत जाळले, न्यायालयाने दिली ‘ही’ शिक्षा

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

नांदेड – किनवट तालुक्यातील बेल्लोरी गावात दि.९ डिसेंबर १६ रोजी मुलगा होत नसल्याच्या कारणावरून आरोपी सत्यव्रत गारौले (४२) याने पत्नीला रॉकेल अंगावर टाकून तिला पेटून दिले होते. 

यावर आरोपीला प्रमुख जिल्हा न्यायाधीश दीपक ढोलकिया यांनी शुक्रवारी जन्मठेप व ५ हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली.

सविस्तर माहिती अशी की, किनवट तालुक्यातील बेल्लोरी गावात सत्यव्रत गारौले व त्याची पत्नी सत्यभामा गारौले यांचा संसार सुरु होता. या दाम्पत्याला चार मुली होत्या. तुला मुलगा का होत नाही म्हणून त्यांच्यात नेहमी वाद होत. 

सत्यव्रत सतत तिचा शारीरिक व मानसिक छळ करत होता व दारू पिऊन मारहाण करीत होता. दि.९ डिसेंबर १६ रोजी संध्याकाळी ६ वाजता घरी त्याने याच कारणावरून तिच्याशी वाद घातला. 
या वादाचे पर्यवसान भांडणात झाले. दारुच्या नशेत त्याने घरात ठेवलेली प्लास्टिक बाटली ठेवलेले रॉकेल तिच्या अंगावर टाकून तिला पेटून दिले. त्यात ती ९४ टक्के भाजली. 

उपचार दरम्यान ती मरण पावली. मृत्युपूर्व जबाबात तिने सत्यव्रतने तिला पेटवून दिल्याचे सांगितले. याप्रकरणी किनवट पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला. पोलिस निरीक्षक डाँ.अरुण जगताप यांनी तपास करुन दोषारोप पत्र न्यायालयात दाखल केले.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24