आपण पक्षाला काय दिले, याचा विचार करावा

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

नागपूर : भारतीय जनता पक्ष हा ‘बायोडाटा’वाला पक्ष नाही. तिकिटासाठी कार्यकर्ता केवळ आपल्या दोन डोळ्यांनी नेत्यांकडे पाहतो. तर कार्यकर्त्यांचा ‘डाटा’ पाहण्यासाठी पक्षात अनेक डोळे असतात,

असे सांगत भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष जगतप्रसाद नड्डा यांनी समर्पित भावनेने पक्षाचे काम करा, असे आवाहन पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना केले.बुधवारी भाजपाचा विदर्भ विभागीय विजय संकल्प मेळावा रेशीमबाग येथील सुरेश भट सभागृहात पार पडला.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह मंत्री, आमदार, खासदार, महापालिका आणि जिल्हा परिषदांमधील पदाधिकारी, कार्यकर्ते मेळाव्याला उपस्थित होते. कार्यकर्त्यांनी पक्षाप्रती समर्पित भाव ठेवावा.

आपण पक्षाला काय दिले, याचा विचार करावा. निवडणुका जिंकण्यासाठी संघटनात्मक पातळीवर व त्यातही सर्वांत खालच्या पातळीवर अधिक लक्ष देण्याची गरज आहे.

अहमदनगर लाईव्ह 24