नगर – नगर शहरातील पारनेर तालुक्यातील रहिवाशांच्या वतीने पारनेरचे आमदार लंके यांचा सत्कार करण्यात आला. या सत्कार प्रसंगी नवनिर्वाचित आ. निलेश लंके म्हणाले,
नगर शहरातील पारनेर तालुक्यातील रहिवाशांचे माझ्या विजयात मोलाचे योगदान आहे. शहरातील प्रत्येक रहिवाशांनी पारनेर तालुक्यात आपले नाते, आप्तेष्ट व कुटुंबाच्या माध्यमातून माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यास विजयी केले. मी पारनेर तालुक्यातील मतदारांइतकाच शहरवासीयांचा ऋणी आहे,असे ते म्हणाले.
पं. स. सदस्य सुरेश धुरपते, माजी जि. प. सदस्य सुरेश सुंबे, राष्ट्रवादीचे प्रदेश राज्य सरचिटणीस अंबादास गारूडकर, एलआयसीचे अशोक गोरे, राधाकृष्ण वाळुंज, संजय गारूडकर, शहर बँकेचे अशोक कानडे, राजेंद्र शेळके, प्रा. योगेश घोडके, प्रा. अशोक झरेकर, चंदू मेहेत्रे, शिवाजी लंके, बाबासाहेब जाधव, नंदा शेंडगे, शिक्षक बँकेचे माजी चेअरमन संजय धामणे, संचालक बाबा पवार आदी उपस्थित होते.
प्रास्ताविकात राजेंद्र शेळके म्हणाले, पारनेर तालुक्यासाठी आज हक्काचा माणूस भेटला आहे. सर्वसामान्यांना आपल्या प्रश्नासाठी हक्काच्या आमदार नीलेश लंके यांच्याकडे जाता येणार आहे. तालुक्यातील प्रश्न आता मार्गी लागणार आहेत. सुशिक्षित बेरोजगारप्रश्नी आ. लंके यांनी लक्ष घालावे, अशी विनंती त्यांनी केली.